पृथ्वीवरील 70 टक्के भाग पाण्याचा आणि त्यातला अधिकांश भाग महा सागरांचा आहे. तिथे त्यांची सीमा कशी ठरवणार? जगाच्या नकाशात पाच महासागर दाखवले जातात; पण अर्थातच त्यांच्या काही सीमारेषा आखलेल्या नसतात. तरीही हिंदी आणि प्रशांत महासागरांची अशी एक सीमा दाखवता येऊ शकते. या ठिकाणी दोन्ही महासागरांच्या पाण्याचे रंग वेगवेगळे दिसतात.हे दोन्ही महासागर अलास्काच्या खाडीत एकमेकांना भेटतात. त्यांचा संगम हा जगातील अनोख्या दृश्यांपैकी एक आहे. एक ग्लेशियर म्हणजेच हिमनद्यांपासून येणारे हलक्या निळ्या रंगाचे पाणी आणि दुसरे दूरवर पसरलेल्या समुद्राचे गडद निळ्या रंगाचे पाणी याठिकाणी दिसते. दोन्ही पाण्यांच्या संगमावरील फेसाची भिंतही याठिकाणी दिसते. पाण्याचे घनत्व आणि तापमानासह अनेक बाबतीत वेगळेपण असल्याने हे दृश्य दिसत असते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews